अवघ्या तासाभरात होतेय श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, भाविकांकडून मंदिर समितीच्या 'त्या' निर्णयाचे स्वागत
अवघ्या तासाभरात होतेय श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, भाविकांकडून मंदिर समितीच्या 'त्या' निर्णयाचे स्वागत
img
DB
पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन व्हावे ; यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंदी बरोबरच दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यात आली आहे. दर्शन रांगेची गती वाढली आहे.



त्यामुळे आता दर्शन रांगेतील भाविकांना अवघ्या तासाभरात देवाचे पदस्पर्श दर्शन मिळू लागले आहे. लवकर दर्शन मिळाल्याने भाविकांनी व्हीआयपी दर्शन बंदीचे स्वागत केले.

पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून दररोज हजारो भाविक येत असतात. आषाढी वारीच्या निमित्ताने तर भाविकांची संख्या अधिक वाढली आहे.

दरम्यान मंदिर समितीने आतापर्यंत व्हीआयपी दर्शन सुविधा सुरु केली होती. अर्थात या व्हीआयपी दर्शन रांगेतून भाविकांना सोडण्यात येत असल्याने दर्शन रांगेत असलेल्या भाविकांना देवाच्या दर्शनाला विलंब होत होता. मात्र आता दर्शन घेणे सोयीचे झाले आहे.

दर्शन रांगेतून येणाऱ्या भाविकांचे जलद व सुलभपणे दर्शन व्हावे; यासाठी मंदिर समितीने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

तर दर्शन रांगेतून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी दर्शन बारीला जाळीचे गार्ड बसविले आहेत. ऑनलाईन दर्शन सुविधा देखील बंद केली आहे. त्याचा एकत्रित चांगला परिणाम दिसून येऊ लागला आहे.

दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना अवघ्या एक ते दीड तासामध्ये जलद व सुलभपणे दर्शन मिळत आहे. लवकर दर्शन होत असल्याने अनेक भाविकांनी मंदिर समितीच्या या निर्णयाचे स्वागत केले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group