मस्क यांच्या जगप्रसिद्ध टेस्ला कारची भारतात एंट्री ; मुंबईतील बीकेसी येथे उघडलं पहिलं शोरूम ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मस्क यांच्या जगप्रसिद्ध टेस्ला कारची भारतात एंट्री ; मुंबईतील बीकेसी येथे उघडलं पहिलं शोरूम ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
img
Dipali Ghadwaje
टेस्लाने मुंबईतील बीकेसीमध्ये भारतातील पहिले शोरूम उघडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे शोरूम ‘टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर’ म्हणून कार्यरत असेल शोरूमच्या पाट्या मराठी आणि इंग्रजीत लावल्या, मराठी भाषेला विशेष मान मिळाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी टेस्लाच्या स्थानिक भाषा आणि संस्कृतीच्या आदराचे कौतुक केले. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी टेस्लाने आज मुंबईतील बीकेसीमध्ये भारतातील आपल्या पहिल्या शोरूमचे उद्घाटन केले.

टेस्ला कंपनीच्या भारतातील पहिल्या आणि आधुनिक शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.

टेस्लाने आपल्या शोरूमच्या पाट्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लावल्या आहेत, ज्यामुळे मराठी भाषेला विशेष मान मिळाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी टेस्लाच्या या पाऊलाचे स्वागत करताना स्थानिक संस्कृती आणि भाषेचा आदर करण्याच्या कंपनीच्या भूमिकेचे कौतुक केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्घाटन समारंभात सांगितले की, टेस्लासारख्या जागतिक कंपनीचे महाराष्ट्रात आगमन हे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देणारे आहे. “टेस्लाने मराठी भाषेचा आदर राखत स्थानिक नियमांचे पालन केले आहे.

यामुळे राज्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे नमूद केले की, महाराष्ट्र सरकार निवेशकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास कटिबद्ध आहे आणि टेस्लाचे हे शोरूम राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देईल.

टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे शोरूम ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांचा अनुभव देण्यासाठी ‘टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर’ म्हणून कार्यरत असेल. येथे ग्राहकांना टेस्लाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल आणि वाहनांची चाचणीही घेता येईल.

टेस्लाच्या मुंबईतील शोरूममुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेला नवे बळ मिळणार आहे. कंपनीने स्थानिक भाषेचा, लोकांचा आदर राखत मराठी भाषेत पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठी संस्कृती आणि भाषेचा सन्मान झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होतेय. अनेकांनी टेस्लाच्या मराठी पाटीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्थानिक भाषेचा आदर राखणे हे टेस्लाचे मोठे पाऊल आहे. यामुळे मराठी भाषेचा गौरव वाढला, असे एका नेटकऱ्यानी म्हटले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group