मोठी बातमी : निवडणूक आयोगाची तयारी सुरु, 'या' महिन्यात महापालिका निवडणुका होणार ; 'ही' महत्वाची माहिती आली समोर
मोठी बातमी : निवडणूक आयोगाची तयारी सुरु, 'या' महिन्यात महापालिका निवडणुका होणार ; 'ही' महत्वाची माहिती आली समोर
img
Dipali Ghadwaje
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. मात्र निवडणुका कधी होणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , छत्रपती संभाजी नगरमध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या द्दष्टिने आढावा बैठक पार पडली.  या बैठकीत निवडणूक आयोगाने  उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचा विचार करण्यात आला आहे.

त्यामुळे या निवडणुका एकाच टप्प्यात होणे शक्य नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात दोन ते तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याची सध्या माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे डिसेंबर महिन्यात राज्यातील सर्व महापालिकांची निवडणुका होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर वार्ड रचना, आरक्षण आणि मतदार याद्या तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाकडून सुरु करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने निवडणूका घेण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group