भाजपचं कमळ फुललं, 'याठिकाणी' मतदानापूर्वीच दोन उमेदवार जिंकले
भाजपचं कमळ फुललं, 'याठिकाणी' मतदानापूर्वीच दोन उमेदवार जिंकले
img
वैष्णवी सांगळे
राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या. ठिकठिकाणी तिकिटासाठी रडारड , आंदोलने आणि वाद राज्यात पहायला मिळाले. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने आपलं खातं उघडलं आहे. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्याची आहेत. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपने दोन जागांवर मतदानापूर्वीच बाजी मारली. 'प्रभाग १८ अ'मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकाही विरोधकाकडून त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने रेखा चौधरींचा विजय निश्चित झाला. 

तर आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक 26 (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक 18 (अ) मधून बिनविरोध विजय मिळवला आहे. रेखा चौधरी या दुसऱ्यादा निवडून आल्या आहेत, तर आसावरी नवरे यांची ही पहिलीच टर्म असल्याची माहिती आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group