महाराष्ट्रात महिलाराज, २९ पैकी १५ महापालिकांची सूत्र महिलांच्या हाती
महाराष्ट्रात महिलाराज, २९ पैकी १५ महापालिकांची सूत्र महिलांच्या हाती
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या सोडतीत ५० टक्के महिला आरक्षणाच्या धोरणानुसार यंदा २९ पैकी १५ शहरांमध्ये महिला महापौर विराजमान होणार आहेत. 

५० टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील १५ महापालिकांवर महिला राज असणार आहे. महिलांना असलेल्या ५० टक्के आरक्षणानुसार, ४ महापालिकांमध्ये ओबीसी महिला , तर ९ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. विशेष म्हणजे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या चारही मोठ्या शहरांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. 

महिलांसाठी राखीव पदे (एकूण १५ जागा)

अनुसूचित जाती महिला (SC Women): लातूर, जालना

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC Women): अहिल्यानगर, जळगाव, अकोला, चंद्रपूर.

सर्वसाधारण महिला (Open Women) : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, धुळे, मिरा-भाईंदर, मालेगाव, सोलापूर
इतर बातम्या
Join Whatsapp Group