३ डिसेंबर की २१ डिसेंबर, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी कधी होणार ? न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी
३ डिसेंबर की २१ डिसेंबर, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी कधी होणार ? न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी
img
वैष्णवी सांगळे
नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती  समोर आली आहे. आता नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकीविषयी नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. त्यानुसार उद्या मतमोजणी होणार नाही तर निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होईल. नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल पुन्हा लांबणीवर गेल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. 

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा २० नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 

याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group