महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाची म्हणजेच मूळ शिवसेनापक्ष सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार होती. सर्वोच्च न्यायालयाने मागील तारखेला या प्रकरणातील युक्तिवादाचे वेळापत्रकही ठरवून दिले होते. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरील वाद आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असताना अरवली पर्वतरांगा प्रकरणामुळे या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा तारीख मिळाली. आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर शिवसेनाप्रमुख बाळासाहे ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी अंतिम युक्तिवाद होणार असून, या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.