मी ६ जन्माला घातली, तुम्ही २० घाला, तिकडे जाऊन १० नव्हे तर २० मुलं जन्माला घाला, नवनीत राणा-ओवैसी आमनेसामने
मी ६ जन्माला घातली, तुम्ही २० घाला, तिकडे जाऊन १० नव्हे तर २० मुलं जन्माला घाला, नवनीत राणा-ओवैसी आमनेसामने
img
वैष्णवी सांगळे
भाजपच्या माजी खासदार आणि एएमआयचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक वाद पाहायला मिळत आहे. लोकसंख्या वाढीच्या मुद्यावरून या दोघांमध्ये शा‍ब्दिक लढाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नवनीत राणा यांनी हिंदूंना ३ ते ४ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. 



यावर ओवैसी यांनी यावर उत्तर देताना म्हणाले, तुम्हाला कोणी अडवलं आहे, मी ६ मुले जन्माला घातली आहेत. तुम्ही २० मुलं जन्माला घाला. आम्हाला काय करायचंय?" असे म्हणत त्यांनी नवनीत राणांना डिवचले, यावरच नवनीत राणा पुन्हा प्रतिहल्ला करत म्हणाल्या ओवैसी हे किडा असून त्यांना पाकिस्तानला हाकला असे विधान केले.

नवनीत राणा म्हणाल्या की, डेमोक्रेसी बदलत जात आहे, यावर ओवैसींनी बोललं पाहिजे. या देशात राहायचं असेल तर संविधानाला मानलं पाहिजे. ओवैसी यांचे देशाचे नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवलं पाहिजे. तिथे जाऊन दहा नाही, तर 20 मुलं जन्माला घाला. ओवैसी तुमच्या मनात काय विचार चालला आहे हे आम्हाला माहिती आहे. डेमोक्रेसीवर बोला, आपण संसदचे सदस्य आहात. तुम्ही संविधानाला मानत नाही. 

भारत माता की जय बोलत नाही. वंदे मातरम बोलत नाही. मग तुम्ही या देशाला काय मानता? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्टीची मान्यता रद्द करून त्यांना पाकिस्तानला फेकलं पाहिजे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. आता असदुद्दीन ओवैसी नवनीत राणांच्या वक्तव्यावर काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group