भाजप पदाधिकाऱ्याची हत्या ! पक्षातील अंतर्गत वादातून भयंकर घडलं
भाजप पदाधिकाऱ्याची हत्या ! पक्षातील अंतर्गत वादातून भयंकर घडलं
img
Nandini khandare More
देशातील राजकरणात सध्या मोठया हालचालींना वेग आला असून आता एका राजकीय पक्षातील अंतर्गत वादातून एक भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे.  पश्चिम बंगालमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. ८ ते १० जणांनी भरचोकात लाथाबुक्क्या आणि काठ्यांनी मारहाण करत जागीच संपवलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहेत. पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर येथे ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याला मेदिनीपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी मेदिनीपूर ग्रामीण भागातील हाथीहलकर येथे घडली. भाजपमधील अंतर्गत गटबाजीच्या वादातून ही घटना घडली. पक्षातील जुने आणि नवीन सदस्य यांच्यात वाद आहे. शमशेर आणि इतर अनेकांवर दुसऱ्या गटाच्या सदस्यांनी हल्ला केला. जिल्हा भाजप अध्यक्ष सौमेन तिवारी यांनी सांगितले की, नेमके काय घडले याचा तपास सुरू आहे. अद्याप कोणतीही पोलिस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.

या वर्षी मे महिन्यात पश्चिम बंगालमधील न्यूटाऊन येथे एका भाजप कार्यकर्त्याला घेरून त्याची हत्या करण्यात आली होती . भाजपच्या विजयानंतर मधु मंडल नावाचा एक भाजप कार्यकर्ता आपल्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर पक्षाचा झेंडा फडकवत होता. झेंड्यावरून त्याचा कमल नावाच्या टीएमसी कार्यकर्त्यासोबत वाद झाला होता. दोघांमध्ये जोरदार वादविवाद झाल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले.

त्यानंतर मधू मंडल यांना फोन करून त्याच ठिकाणी परत बोलावण्यात आले. त्यानंतर काही स्थानिक टीएमसी सदस्यांनी मधू मंडल यांना घेरले आणि त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेनंतर परिसरातील वातावरण तापले होते. आरोपींविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group