राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ! भाजप  युवा नेत्याची गोळ्या झाडून हत्या
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ! भाजप युवा नेत्याची गोळ्या झाडून हत्या
img
Nandini khandare More
देशातील राजकारणात सध्या मोठया घडामोडी घडत असून आता बिहारच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बिहारमधील सहरसा जिल्ह्यात धक्कादायक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत सिंह राजपूत यांची त्यांच्या घरातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सहरसा येथील वॉर्ड क्रमांक 15 मध्ये ही घटना घडली. 22 वर्षीय अभिजीत सिंह राजपूत, अशी मृत तरुणाची ओळख पटली आहे. त्यांचे वडील हर्षवर्धन सिंह यांचे यापूर्वीच निधन झाले आहे.

अधिक माहिती अशी की , अभिजीत यांचा मृतदेह घरातील बंद खोलीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्री दोन वाजल्यानंतर घडली असावी. अभिजीत यांच्या चेहऱ्यावर उशी ठेवलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अभिजीत एका पार्टीला गेले होते. पार्टीवरून घरी परतल्यानंतर काही वेळातच त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. सकाळी त्यांचा मित्र आर्यन घरी पोहोचला असता, घराच्या बाहेरील गेटला कुलूप असल्याचे त्याला दिसले. आर्यनने खिडकीतून घरात पाहिले असता अभिजीत यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने अभिजीत यांच्या भावाला याची माहिती दिली. त्यांचा भाऊ गावात राहत असल्याची माहिती आहे. दरम्यान, अभिजीत यांच्या हत्येप्रकरणी आर्यनवरच आरोप करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.पोलिसांकडून हत्येचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group