राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बड्या नेत्यांना पक्षप्रवेश देणाऱ्या भाजपलाच आता मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असतानाच आता भाजपलाच दणका बसला आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये मोेठा पक्षप्रवेश झाला आहे.
मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं बळ मिळालं आहे. भाजपचे माजी नगरसेवक नरेश पाटील आणि अमजद शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांच्या नेतृत्वात आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
महिला जिल्हाध्यक्षा ममता मॉरिस आणि युवक प्रदेश सरचिटणीस साजिद पटेल यांचीही यावेळी उपस्थिती होती. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत, येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.