धक्कादायक ! भाजप नेत्याची बॉडी पुलाजवळ सापडली, राजकीय वर्तुळात खळबळ
धक्कादायक ! भाजप नेत्याची बॉडी पुलाजवळ सापडली, राजकीय वर्तुळात खळबळ
img
वैष्णवी सांगळे
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.  गंगापूर तालुक्यातील नारवाडी-हदियाबाद येथे शुक्रवारी ३० वर्षीय भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह आढळून आलाय. मुख्य म्हणजे दोन दिवसांपासून गणेश टेमकर बेपत्ता होते. 



गणेश हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी होते. भाजप युवा मोर्चाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष पदावर ते काम करत होते. दरम्यान गणेश दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबीय-नातेवाईकांसह मित्र परिवार आणि कार्यकर्ते यांच्याकडून गणेश यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता, मात्र कुठेही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गणेश टेमकर यांचा मृतदेह हदीयाबाद नारवाडी मार्गावर नळकांडी पुलाजवळ आढळून आला.

टेमकर यांचा मृतदेह सापडल्यानंतर गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. टेमकर यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि चार बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मृत्यूबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. गंगापूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group