आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना भाजपाला मात्र मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला धक्का बसला आहे. भाजपचे नवनियु्क्त जिल्हा उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर तुषार हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या शहर कार्यकारिणीवरून नाराजी उफाळून आली आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन सरचिटणीस पदे दिली. पण, पिंपरीला डावलल्याचा आक्षेप घेत नवनियुक्त उपाध्यक्ष तुषार हिंगे यांनी राजीनामा दिला आहे.
राजीनामा दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'पिंपरी विधानसभा क्षेत्रावर भाजपकडून अन्याय केला जात आहे. या विरोधात मी जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. माझी मागणी होती की, एखाद्या पदाधिकाऱ्याला शहरचिटणीस पद देण्यात यावं. मात्र, पक्षाकडून माझ्या मागणीची उपेक्षा करण्यात आली.