नाशिक : विश्वास टाकणं पडलं महागात ! शेजारी राहणार्‍या दोन महिलांनी लांबविले साडेचार तोळ्यांचे दागिने
नाशिक : विश्वास टाकणं पडलं महागात ! शेजारी राहणार्‍या दोन महिलांनी लांबविले साडेचार तोळ्यांचे दागिने
img
वैष्णवी सांगळे
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - घराची चावी विश्‍वासाने ठेवण्याकरिता शेजार्‍यांकडे दिली असता दोन महिलांनी संगनमत करून महिलेच्या घरातील सुमारे चार तोळ्यांचे दागिने चोरून नेल्याची घटना अंबड येथे घडली.

भीषण अपघात ! भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कीर्ती सुनील काजळे (रा. गिरीधर अपार्टमेंट, अंबड) आणि आरोपी मनीषा प्रशांत माळी व लता जाधव या तीनही महिला एकाच सोसायटीत राहतात. काजळे यांनी दि. 10 जून ते 12 ऑगस्ट 2025 या कालावधीत राहत्या घराची चावी विश्‍वासाने ठेवण्याकरिता दिली होती.

घरचा आहेर ! विशेष अधिवेशन बोलवा; मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार आक्रमक

फिर्यादी यांच्याशेजारी राहणारी आरोपी मनीषा माळी व तिची नणंद लता जाधव यांनी संगनमत करून फिर्यादीच्या राहत्या घरात प्रवेश करून 3 लाख 60 हजार रुपये किमतीची 40 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 18 हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले व 27 हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल असे एकूण 4 लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.
nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group