वडनेर दुमाला येथे आठवडाभरात दोन बिबट्या पकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के येथे गेल्या अनेक दिवसापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. म्हेळूस्के गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याने दहशत माजवली होती. जनावरे, कुत्रे, वासरे यांच्यासह अनेक पाळीव प्राण्यांवर देखील हल्ले करून ठार केले होते. फक्त रात्रीच नाही तर दिवसाही बिबट्यांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
हे ही वाचा
दिवस बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतातील कामे करण्यास मजूर देखील मिळत नव्हते. काही दिवसांपूर्वी बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार केले होते. त्या मुळे वनविभागाने तीन दिवसांपूर्वी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता,विशेष म्हणजे पिंजरा लावल्यापासून सलग दोन दिवस बिबट्या पिंजऱ्यात येत होता,परंतु पिंजऱ्याची खालची प्लेट बिबट्या उचकवत असल्याने जेरबंद होत नव्हता. स्थानिक शेतकऱ्यांनी पिंजऱ्याची किरकोळ दुरुस्ती केली असता आज अखेर तिसऱ्या दिवशी बिबट्या पिंजऱ्यात अडकला.