नाशिक : हनुमानवाडीजवळील शिंदे मळ्यात बिबट्या जेरबंद
नाशिक : हनुमानवाडीजवळील शिंदे मळ्यात बिबट्या जेरबंद
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) -   मखमलाबादरोडवरील हनुमानवाडीजवळ शिंदे मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात आज पहाटे बिबट्या जेरबंद झाला आहे.

नाशिक शहर आणि परिसरामध्ये सातत्याने मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर असल्याच्या घटना समोर येत आहेत. चार दिवसांपूर्वीच कामगारनगरमध्ये बिबट्या जेरबंद झाला होता. या बिबट्याने हल्ला करून वनविभागाच्या कर्मचार्‍यांसह काही नागरिकांना जखमी केले होते.

वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोडवरील हनुमानवाडी परिसरातील आप्पासाहेब शिंदे यांच्या गट नं. 55 मधील मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता.  आज पहाटे या पिंजर्‍यात अंदाजे तीन ते चार वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला आहे.

या परिसरात बिबट्या असल्याची तक्रार 15 नोव्हेंबर रोजी वनविभागाकडे आल्यानंतर या परिसरामध्ये पिंजरा लावण्यात आलेला होता. या पिंजर्‍यामध्ये आज हा बिबट्या जेरबंद झाल्याची  माहिती मिळाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ व त्यांच्या कर्मचार्‍यांनी जाऊन या बिबट मादीला ताब्यात घेऊन पुढील प्राथमिक तपासणी व कारवाईसाठी वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे रवाना केले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group