राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजले आहे. पक्षांतरेही अशात सुरूच आहे. दरम्यान आगामी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली असून पक्षांकडून निवडणुक प्रभारींची यादी जाहीर करण्यात येत आहे.
बुधवारी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून आज शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी ही यादी जाहीर केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड, पिंपळगाव बसवंत, ओझर, येवला, सटाणा, नगरपरिषदांसाठी आमदार सुहास कांदे, किशोर दराडे आणि माजी आमदार धनराज महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर, मनमाड आणि नांदगाव नगर परिषदेसाठी आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह, सिन्नर, भगुर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषदेसाठी माजी खासदार हेमंत गोडसे आणि उपनेते विजय करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.