नाशिक : को-ऑपरेटिव्ह सर्व्हिस कंपनीच्या नावाखाली सहा लाखांहून अधिक रकमेची फसवणूक
नाशिक : को-ऑपरेटिव्ह सर्व्हिस कंपनीच्या नावाखाली सहा लाखांहून अधिक रकमेची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :-स्कीम दाखवून सुविधांचे आश्‍वासन देत को-ऑपरेटिव्ह सर्व्हिस कंपनीच्या अधिकार्‍यांनी विश्‍वास संपादन करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शिल्पा वसंत जाधव (वय 42, रा. गोविंदनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 16 फेब्रुवारी 2025 ते 15 जुलै 2025 या कालावधीत विस्तारोवा इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह सर्व्हिसेस प्रा. लि.चे अधिकृत डायरेक्टर आणि मुळ मालक असलेल्या सचिन माणिक सूर्यवंशी (लातूर), महेश प्रल्हाद कांबळे (पुणे), अविनाश खोपडे (भोर, पुणे), स्वपनील देवधर कवडे (जुनी सांगवी, पुणे), कमलेश शिंदे (दापोडी, पुणे) आणि धरम संगत (थेरगाव, पुणे) यांनी स्कीम दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

एसीएम बिल्डिंग, तिडके कॉलनी, नाशिक येथून ही कंपनी कार्यरत असल्याचे दाखवत फिर्यादी आणि इतर नागरिकांकडून एकूण 6लाख 97 हजार 300 रुपये स्वीकारण्यात आले. मात्र स्किमप्रमाणे कोणतीही सुविधा न देता आरोपी रकमेचा अपहार करून पळून गेले, अशी तक्रार करण्यात आली.

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास वपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि शेख करीत आहेत.
nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group