नाशिक : मॅच्युअर बॉण्ड्सच्या चौकशीच्या बहाण्याने वृद्धाला ९९ हजारांचा गंडा
नाशिक : मॅच्युअर बॉण्ड्सच्या चौकशीच्या बहाण्याने वृद्धाला ९९ हजारांचा गंडा
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅच्युअर झालेल्या बॉण्ड्सबद्दल चौकशी करण्यासाठी कॉल करून अज्ञात इसमाने गुगल पेवर 20 रुपये ऑनलाईन टाकण्यास भाग पाडून वृद्धाची 99 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पांडुरंग शंकर सोनवणे (रा. ऋषिराज मारवेल, नक्षत्र कॉलनी, गंगापूर रोड) हे सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून अज्ञात व्यक्तीने फोन केले. फिर्यादी यांच्या नातेवाईकांचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅच्युअर झालेल्या बॉण्ड्सबद्दल चौकशी करण्यासाठी फिर्यादींना फोन केले. 

त्यानंतर फिर्यादींना आलेल्या कॉलवरील अज्ञात व्यक्तीने एका गुगल पे नंबरवर 20 रुपये ऑनलाईन टाकावे लागतील, असे सांगून विश्‍वास संपादन केला व नंतर त्या क्रमांकाच्या आधारे सोनवणे यांची 98 हजार 672 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड करीत आहेत.
nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group