उगावचे शेतकरी कैलाश पानगव्हाणे यांची आत्महत्या;
उगावचे शेतकरी कैलाश पानगव्हाणे यांची आत्महत्या;
img
दैनिक भ्रमर
निफाड तालुक्यातील उगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्री कैलाश यादवराव पानगव्हाणे हे आज सकाळी आठ वाजता आपल्या द्राक्ष बागेमध्ये चक्कर मारत असताना त्या ठिकाणी त्यांना द्राक्ष बागेची अतिशय बिकट अवस्था जाणवल्याने त्यांनी त्या ठिकाणी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांना निफाड सिव्हिल येथे दाखल करण्यात आले मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 



याबाबत निफाड पोलीस कार्यालयात मयत शेतकरी कैलास यादवराव पानगव्हाणे यांचे पुतणे शुभम विलास पानगव्हाणे यांनी खबर दिली की सोमवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास माझे घरी बसलेलो असतांना चूलती आशा कैलास पानगव्हाने यांनी लवकर आमचे घरी या .कारण कैलास यादवराव पानगव्हाणे हे घरातील कॉटवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत .

आम्ही धावत त्यांचे घरी गेलो व बघितलेअसता चूलते कैलास यादवराव पानगव्हाणे वय ४४  हे सकाळी मळ्यात चक्कर मारायला गेले व त्यानंतर ते घरी आले व त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर ते घरातील कॉटवर बेशुद्ध होवून खाली पडले. त्यानंतर त्यांचे तोंडाला फेस देखील येत होता. त्यामुळे शुभम पानगव्हाणे अक्षय कैलास पानगव्हाणे, शेजारी रहाणारे सूनिल नामदेव पानगव्हाणे यांनी लोगान गाडीमध्ये टाकून निफाड सरकारी दवाखान्यात आणले तेथील डॉक्टरांनी तपासून कैलास यादवराव पानगव्हाणे यांनामृत घोषित केले.

याबाबत निफाड पोलीस कार्यालयात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास निफाड पोलीस निरीक्षक श्री गणेश गुरुव याचे मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस करीत आहेत.

निफाड शेत तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी या संदर्भात बोलताना याबाबत अहवाल प्राप्त झाला असून अधिक माहिती कृषी अधिकारी यांचे मार्फत संकलित करून ती जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल असे सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group