निफाड : राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. राज्यातील काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक जिल्यातील निफाड शहरासह तालुक्यात पारा घसरण सुरुच आहे. सोमवार दि १६ रोजी पारा ५.६ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात करण्यात आली आहे.
दरम्यान डिसेंबर अखेर निफाड तालुक्यातील द्राक्षबागायतदारांचे धाबे दणाणले आहे. ऎन द्राक्षमाल फुगणवणीच्या काळात थंडीचा जोर वाढल्याने द्राक्षाच्या फुगवणीवर परिणाम होणार आहे, शिवाय या कडाक्याच्या थंडीमुळे परिपक्व झालेल्या द्राक्षमण्यांना तडे जाऊन नुकसानीचा धोका देखील वाढला आहे.