ओझर : सावत्र बापाने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दात्याने शिवारात घडली. अत्याचारानंतर त्या नराधमाने तिला जिवेठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटना एका उसाच्या शेतात घडली. या सावत्र बापाने अल्पवयीन पीडितेस बकऱ्यांना चारा आणायला चाल असे सांगत सोबत नेले. तेथे त्याने पीडितेसोबत बळजबरी करत जवळील द्राक्षबागेत तिच्या अंगावरील वस्त्र काढण्यास सांगितले. त्याच क्षणी पीडितेने आरडाओरडा केल्यावर त्याने तिला मारहाण करत ऊसाच्या शेतात ओढून नेत खाली पाडले. हातातील खुरपे गळ्यावर ठेवत तू ओरडलीस तर तुला जीवे ठार मारून विहिरीत फेकून देईल अशी धमकी दिली. दारूच्या नशेत त्याने हा प्रकार केल्याचे समजते. ओझर पोलिसांनी तत्काळ आरोपीला आज अटक केली. पुढील तपास ओझर पोलीस करत आहे.