दुःखद घटना: सोनेवाडीत माय लेकाची शेततळ्यात आत्महत्या
दुःखद घटना: सोनेवाडीत माय लेकाची शेततळ्यात आत्महत्या
img
Jayshri Rajesh
निफाड (भ्रमर प्रतिनिधी )निफाड तालुक्यातील सोनेवाडी बु येथील विवाहिता सुजाता भूषण निचित (२६) व मुलगा  गुरु भूषण निचित (२) या मायलेकांनी शेततळ्यात आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आली आहे. 

शेततळ्यातुन मायलेकांचे मृतदेह चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने बाहेर काढले निफाड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले. मयत विवाहितेचे माहेर हे तालुक्यातील गाजरवाडी येथील असुन सासरच्यांविरोधात निफाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या घटनेची माहिती कळताच सर्वांनाच धक्का बसला. माय लेकांना आत्महत्या केली की ते तळ्यात बुडाले हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. या घटनेनंतर गावक-यांनी एकच गर्दी करत हळहळ व्यक्त केली. आईचे वयही फार नव्हते. तीन वर्षापूर्वीच लग्न झाल्याचे बोलले जात आहे.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group