भोसला शाळेत बिबट्या शिरल्याची माहिती आज वन विभागाला कळविण्यात आली होती. त्यानंतर वनविभागाने त्वरीत घटनास्थळी दाखल होत शोध मोहीम सुरू केली. यावेळी भोसला मिलिटरी स्कूल येथे राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये बिबट्याचा कोणत्याही प्रकारचा वावर आढळून आलेला नाही.
तरी दक्षता म्हणून वनविभागाचे पथक परिसरात गस्त करत आहेत. शंका असलेल्या ठिकाणी आठ ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत आहेत व ज्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत त्याची शाळा प्रशासनाच्या मदतीने तपासणी करण्यात येत आहे.
शाळेतील व हॉस्टेलमधील विद्यार्थी यांचे करिता जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले आहे. शाळा प्रशासनाकडून परिसरात वाढलेले दाट गवत व इतर ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. आज रात्री देखील वनविभागाच्या वतीने थर्मल ड्रोन व इतर माध्यमातून शोध मोहीम तसेच गस्त करण्यात येणार आहे.
आवाहन
नागरिकांना तसेच पालकांना विनंती करण्यात येते की, कुणीही घाबरून जाऊ नये तसेच संपूर्ण माहितीचे तथ्य तपासल्याशिवाय वा खात्री केल्याशिवाय कोणत्याही चुकीच्या बातम्या, अफवा पसरवू नये..
कुठेही बिबट्याचा वावर आढळून आल्यास वनविभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.