दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, नाशिकमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून रामकुंड , पंचवटी आणि तपोवन यांसारख्या संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काळाराम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरही विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तर नाशिकरोड रेल्वे स्थानकावर बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून मालेगावात देखील हायअलर्ट देण्यात आला आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, नाशिक पोलीस शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि संशयित व्यक्तींची कसून चौकशी करत आहेत.
अती संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगावचा दोन बाँबस्फोटचा इतिहास बघता मालेगावमध्येही हायअलर्ट दिल्याचे बोलले जात आहे. यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. रात्रीच पोलिसांनी विविध हॉटेल, लॉजिंग वर छापा सत्र केले. तसेच रस्त्यावर बेरिगेट लावत संशयित वाहनांची तपासनी देखील करण्यात आली.