नाशिक : भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड ठाकरेंच्या शिवसेनेत
नाशिक : भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड ठाकरेंच्या शिवसेनेत
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे.  भाजप पदाधिकाऱ्याने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेश होताच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी ‘नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही’ असं उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोलाही लगावला आहे.


भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड यांनी आज (सोमवार) भव्य शक्ती प्रदर्शन करत ‘मातोश्री’ या निवासस्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी खासदार संजय राऊत, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी हे देखील उपस्थित होते.

पक्षप्रवेशावेळी मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. संगीता गायकवाड नाशिकमधील प्रभाग क्रमांक 20च्या माजी नगरसेविका असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला नाशिकमध्ये मोठे खिंडार पडले आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये संगीता गायकवाड यांचे पती हेमंत गायकवाड हे निवडणूक लढवणार आहे. 
nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group