दिल्ली येथे झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरलाय. या स्फोटानंतर संपूर्ण देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
इस्लामाबादमधील जिल्हा न्यायालयाजवळ एका वाहनाचा मोठा स्फोट झाला. दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास न्यायालयाचे कामकाज सुरू असताना हा स्फोट झाला. माहितीनुसार, या भीषण स्फोटमुळे वकिलासह १२ जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर, २० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबादच्या जिल्हा न्यायालयीन संकुलाच्या गेटबाहेर जी - ११ परिसरात हा बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट एका पार्क केलेल्या कारमध्ये झाला. हा स्फोट गॅस सिलेंडरचा स्फोट किंवा बॉम्बस्फोट असल्याचा संशय आहे. अचानक स्फोट झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.