भारताचं टेन्शन वाढलं ! पाकिस्तान आणि अमेरिकेत मोठा करार
भारताचं टेन्शन वाढलं ! पाकिस्तान आणि अमेरिकेत मोठा करार
img
वैष्णवी सांगळे
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. एकीकडे टॅरिफच्या मुद्द्यावरून भारताच्या विरोधात आग ओकणारी अमेरिका दुसरीकडे पाकिस्तानसोबत मोठे करार करताना दिसतेय.आता नुकताच भारताला धक्का देणारी आणि खळबळ उडवणारी माहिती पुढे आलीये. 

अमेरिकेच्या धातू कंपनीने नुकताच पाकिस्तानसोबत तब्बल ५० करोड डॉलरचा खनिज करार केला. या करारावर सह्या देखील झाल्या आहेत. पाकिस्तानातील सर्वात मोठ्या महत्त्वाच्या खनिजांच्या खाणकाम करणाऱ्या पाकिस्तानच्या फ्रंटियर वर्क्स ऑर्गनायझेशनने मिसूरीस्थित यूएस स्ट्रॅटेजिक मेटल्ससोबत सहकार्य योजनांसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. याचा फायदा थेट पाकिस्तानला होणार आहे. 

अमेरिकन कंपनी पाकिस्तानमधील खनिजे आणि तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी गुंतवणूक करतंय. यूएस स्ट्रॅटेजिक मेटल्स महत्त्वपूर्ण खनिजे तयार करते आणि पुनर्वापर करते. यामुळे  पाकिस्तान आणि अमेरिकेतील जवळीकता चांगलीच वाढल्याचे बघायला मिळत आहे,जी भारतासाठी टेन्शन वाढवणारी आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group