घरबसल्या घरपोहोच अगदी सहजरित्या वस्तू मिळवायची असल्यास ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय लाखो लोक वापरतात, पण बऱ्याचदा यात चुकीची वस्तू किंवा खराब वस्तू पॅक करून दिली जाते , त्यामुळे साहजिकच आपली चिडचिड होते. पण अमेरिकेत जे घडलं त्यामुळे कोणाच्याही अंगावर काटा येईल.
एका महिलेने ऑनलाईन तिची काही औषध मागवली होती. मात्र तिला आलेल्या ऑनलाईन बॉक्समध्ये औषध नव्हती. तर या बॉक्समधली वस्तू बघून महिलेच्या काळजाचा ठोका चुकला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील एका महिलेने तातडीची काही औषध मागवली होती. बॉक्सची डिलिव्हरी झाली तेव्हा तिने उघडून पाहिलं असता त्या बॉक्समध्ये दोन हात आणि कापलेली बोट ठेवण्यात आली होती. सुरुवातीला या महिलेला वाटलं कि हॅलोविनच्या निमित्ताने तिला कोणीतरी घाबरवत आहे. मात्र तिने अधिक निरखून पहिले असता ती घाबरली. तिने तातडीने पोलिसांना कळवले.
पोलिसांनी या घटनेचा शोध सुरु केला. तापसादरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औषध नॅशव्हिल विमानतळावर पोहोचले आणि ते महिलेच्या घरी पोहोचवण्यात येणार होते. पोलिसांनी डिलिव्हरी कंपनीशी बोलले तेव्हा त्यांनी कबूल केले की एक बॉक्स चुकून महिलेच्या घरी डिलिव्हर झाला.
अमेरिकेत, मानवी अवयव बहुतेकदा संशोधन किंवा प्रत्यारोपणाच्या उद्देशाने बॉक्समध्ये भरले जातात आणि विमानाने पाठवले जातात. तथापि, ते चुकीच्या पत्त्यावर पोहोचणे दुर्मिळ आहे. या घटनेनंतर, पोलिसांनी असे पार्सल मिळाल्यानंतर घाबरण्याऐवजी ताबडतोब पोलिसांना कॉल करण्याचे आवाहन केले आहे.