ट्रम्प सरकारला मोठा दिलासा! न्यायालयाने टॅरिफवरील स्थगिती 24 तासांत उठवली
ट्रम्प सरकारला मोठा दिलासा! न्यायालयाने टॅरिफवरील स्थगिती 24 तासांत उठवली
img
DB
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  जगभरातील अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावल्यामुळे जग ट्रेड वॉरच्या उंबरठ्यावर आहे. या निर्णयामुळे जगभरातील अनेक देशांमधील शेअर बाजार कोसळले. अशातच ‘यूएस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड’ने डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारत टॅरिफच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचं समोर आलं होतं. परंतु, काही तासांतच न्यायालयाने ही स्थगिती उठवली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेडरल अपील कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. संघीय न्यायालयाने लिबरेशन डे टॅरिफवर बंदी घालण्याचा आदेश स्थगित केला आहे. एक दिवस आधी व्यापार न्यायालयाने आपत्कालीन अधिकारांचा गैरवापर केल्याचा उल्लेख करून दरांवर स्थगिती दिली होती.

वॉशिंग्टन अपील न्यायालयाने व्यापार न्यायालयाच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय की, ‘सरकारची तात्काळ प्रशासकीय स्थगितीची मागणी मंजूर करण्यात येत आहे. या न्यायालयात अपीलचा विचार होईपर्यंत व्यापार न्यायालयाचा निर्णय आणि कायमस्वरूपी मनाई आदेश स्थगित करण्यात येत आहेत.’
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group