अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांच्या खळबळजनक निर्णयाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जगावर होताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या निर्णयामुळे जग आजच्या घडीला महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आंतराष्ट्रीय कायद्यांना देखील केराची टोपली दाखवली जात आहे.
टॅरिफचा मुद्दा अजूनही ज्वलंत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकच्या सैन्याने वेनेजुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नीला मध्यरात्री बेडरूममधून अटक केली आणि थेट अमेरिकेत आणले. त्यानंतर थेट ग्रीनलॅंडला अमेरिका त्यांच्या देशावर ताबा घेईल, अशी धमकी देण्यात आली. हेच नाही तर इराणमध्ये सध्या असलेल्या परिस्थितीमध्येही अमेरिका हस्तक्षेप करताना दिसत आहे. मेक्सिकोमध्ये जमिनीवरून हल्ले केली जातील, असे अमेरिकेने म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच आता मोठे विधान करत म्हटले की, त्यांच्या शक्ती फक्त एकच व्यक्ती रोखू शकतो… तो म्हणजे ते स्वत:, बाकी त्यांना कोणीही रोखू शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, लोकांना त्रास देण्याबद्दल ते विचारही करत नाहीत.