रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. 4 जुलैच्या रात्री रशियाने कीववर हवाई हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. कीववर 11 क्षेपणास्त्रे आणि 550 ड्रोन डागण्यात आले. या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , रशियाकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी फोन चर्चा केली.
या हल्ल्यात एका मुलासह 26 जण जखमी झाले आहे. तर दुसरीकडे रशियाच्या या कारवाईनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली असून रशियाकडून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत माहिती दिली.
झेलेन्स्की म्हणाले की, अमेरिकेने युक्रेनचे हवाई संरक्षण मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियासोबतचे युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलू शकतात. युक्रेनला पाठिंबा देणारे युरोपीय देश युक्रेनची शस्त्रास्त्रांची कमतरता भरून काढणार आहे परंतु त्यासाठी वेळ लागेल.
झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना सांगितले की रशियासोबत आतापर्यंत शांतता प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. थेट शांतता चर्चेत फक्त युद्धकैदी, जखमी सैनिक, शहीद सैनिकांच्या मृतदेहांची देवाणघेवाण झाली आहे. शांतता चर्चेसाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.
युक्रेनला नाटोमध्ये सामील करण्यास रशियाकडून विरोध होत असून युक्रेनला रोखण्यासाठी रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ला केला. दोन्ही देशांमधील युद्ध 3 वर्षे 4 महिने सुरू आहे. 2025 पर्यंत रशियन सैन्याने युक्रेनचा सुमारे 20% भाग ताब्यात घेतला होता. युक्रेनची लोकसंख्या 41 दशलक्ष आहे, परंतु गेल्या 3 वर्षांत 8 दशलक्ष लोकांनी युक्रेन सोडले आहे.