अमेरिकेला चीनची थेट धमकी, इराणवर हल्ला केला तर…
अमेरिकेला चीनची थेट धमकी, इराणवर हल्ला केला तर…
img
वैष्णवी सांगळे
अमेरिका आणि इराण यांच्यामधील स्फोटक संबंध जगजाहीर आहे. अमेरिकेने वारंवार इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. आमचे लष्कर यासाठी पूर्ण ताकदीने तयार आहे असे अमेरिकेकडून सांगितले जात आहे. तर आमच्यावर हल्ला केला तर आम्ही देखील जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा इराणकडून देखील दिला जातोय. या दोन देशात युद्ध झाले तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. 

 दरम्यान, आता अमेरिकेकडून इराणवर दबाव टाकला जात असतानाच चीनने अमेरिकेला थेट धमकावले आहे. चीन इराणच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असून चीनने उघडपणे इराणचे समर्थन केले आहे. त्यामुळे अमेरिकेची आता मोठी अडचण झाली आहे.

वृत्तानुसारअमेरिकेने जर इराणवर हल्ला केला तर आम्ही अमेरिकेला दुर्मिळ खनिजे देणार नाही. दुर्मिळ खनिजांचा पुरवठा आम्ही लगेच थांबवू अशी थेट धमकीच चीनने अमेरिकेला देऊन टाकली आहे. या जगात चीनकडे सर्वाधिक दुर्मिळ खनिजे आहेत. अमेरिका चीनकडूनच ही खनिजे आयात करतो. अशा स्थितीत चीनने अमेरिकेला ही धमकी दिली आहे. चीनने प्रत्यक्षात या धमकीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली तर पुढच्या ४८ तासांत अमेरिकेतील लष्कर सामग्रीसंबंधाचे उद्योग ठप्प पडतील, असे सांगितले जात आहे.

चीनसाठी इराण हा देश खूप महत्त्वाचा आहे. कारण इराणकडून चीनला तेलाचा पुरवठा केला जातो. चीन इराणकडून प्रतिदिन 1.8 दशलक्ष बॅरलची खरेदी करतो. आकड्यांत सांगायचे झाल्यास इराणचे 80 टक्के तेल हे चीन खरेदी करतो. त्यामुळे चीनसाठी इराण हा महत्त्वाचा देश आहे. त्यामुळेच चीनने इराणला थेट धमकी दिली आहे.

तर अमेरिकेसाठी दुर्मिळ खनिजे महत्त्वाची आहेत. या दुर्मिळ खनिजांचा वापर शस्त्रांची निर्मिती करण्यासाठी केला जातो. मिसाईल गाईडन्स सिस्टिम आणि फायटर जेटच्या इंजिनमध्ये या दुर्मिळ खनिजांचा वापर केला जातो. अमेरिकेत याच दुर्मिळ खनिजांचा वापर करून इलेक्ट्रिक चीप तयार केल्या जातात. अमेरिकेला लागणाऱ्या एकूण दुर्मिळ खनिजांपैकी साधारण 90 पुरवठा हा चीनकडून केला जातो.


इतर बातम्या
Join Whatsapp Group