अमेरिकेला इराणने पाडले तोंडावर, युद्ध कधी संपेल हे...
अमेरिकेला इराणने पाडले तोंडावर, युद्ध कधी संपेल हे...
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा मोठा भडका उडाला आहे. या युद्धाचा परिणाम इतर देशांवर आता होताना दिसत आहे. युद्धामुळे कच्चे तेल आणि गॅसचा मोठा तुडवटा निर्माण झाला आहे. पाकिस्तानमध्ये तर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पाकिस्तानात थेट शाळा, कॉलेज आणि पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना इराणसोबतचे युद्ध लवकरच थांबणार असल्याचे मोठे संकेत दिले. इराणची लष्करी ताकद संपल्याचाही मोठा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आल्या. इराण आणि अमेरिका युद्ध लवकराच लवकर संपावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. कारण या युद्धाचा परिणाम आता फक्त तीन दिवसांपुरता मर्यादित राहिला नसून या युद्धाची झळ अनेक देशांपर्यंत पोहोचली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध लवकरच संपू शकते. यावर आता इराणकडून कडक उत्तर देण्यात आले असून थेट मोठा इशाराही देण्यात आला. इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) ने म्हटले आहे की, युद्ध कधी संपेल हे अमेरिका नाही तर इराण ठरवतील.

ट्रम्प यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हटले की, मला वाटते लवकरच म्हणजे खूपच लवकर हे युद्ध संपेल. जर पुन्हा युद्ध सुरू झाले तर इराणला अधिक तीव्र हल्ल्यांना सामोरे जावे लागेल. यावर इराणने म्हटले की, युद्धाचा शेवट आम्हीच ठरवणार. प्रादेशिक गतिशीलता आणि भविष्य आता आपल्या सशस्त्र दलांच्या हातात आहे. अमेरिकन सैन्य युद्ध संपवणार नाही, असे इराणने ठणकावून सांगितले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group