Israel vs Iran War: यूएईपासून अबूधाबी, बहरीनपर्यंत...इराणने ५ देशांवर मिसाईल्स डागल्या
Israel vs Iran War: यूएईपासून अबूधाबी, बहरीनपर्यंत...इराणने ५ देशांवर मिसाईल्स डागल्या
img
वैष्णवी सांगळे
पश्चिम आशियातील इस्रायल–इराण संघर्षाने भीषण वळण घेतल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील कारवाईत इराणची राजधानी तेहरानमध्ये क्षेपणास्त्र हल्ले झाल्याचा दावा केला जात आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या मुख्यालयाजवळ स्फोट झाल्याचे वृत्त आहे. संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल अनिल बाम यांनी इशारा दिला की, रशिया आणि चीन जर इराणच्या बाजूने सक्रिय झाले तर परिस्थिती जागतिक युद्धाकडे झुकू शकते. 

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. अणु करारावरून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावानंतर हा हल्ला झाला आहे. आज सकाळपासून इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज येत असून, आकाशात धूर पसरला आहे.

इराणमधील युद्धाचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यानंतर इराण आक्रमक झाला आहे. इराणने इस्रायलसह यूएई, अबुधाबी, कुवेत, कतार, बहरीनवर मिसाईल डागल्या आहेत. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याला इराणकडून प्रत्युत्तर देण्यात आले. इराणचे बहरिनमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले सुरु केले आहेत.इराणच्या हल्ल्यानंतर आखाती देशांनी हवाई हद्द बंद केली आहे. 

अशातच आता या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. भारतालाही याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. भारतीय अर्थव्यवस्थेवर या युद्धाचा मोठा परिणाम होण्याची चिन्ह आहेत. 


IRAK | iran |
इतर बातम्या
Join Whatsapp Group