इराकमध्ये इमारतींना आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात. सप्टेंबरमध्ये, उत्तर इराकच्या कराकस शहरातील एका फंक्शन हॉलमध्ये लग्नादरम्यान लागलेल्या आगीत सुमारे शंभर लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास केला असता इमारतीमध्ये इमर्जन्सी एक्झिट नसल्याचे समोर आले होते
आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर आली आहे. इराकच्या उत्तरेकडील शहर असलेल्या एरबिल येथील विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग लागली. याआगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी (8 डिसेंबर) ८ च्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान एरबिल शहराच्या पूर्वेला असलेल्या सोरान या छोट्याशा शहरात एका वसतिगृहाच्या इमारतीला भीषण आग लागली. ज्यामध्ये १४ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर १८ विद्यार्थी जखमी झालेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरा ही आग विझवण्यात आली. सोरानच्या आरोग्य निदेशालयाचे प्रमुख कामराम मुल्ला मोहम्मद यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कुर्दिस्तानचे पंतप्रधान मसरूर बरझानी यांनी या घटनेबाबत चौकशी समिती स्थापन केली आहे.