इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. अमेरिकेने भीषण हल्ले इराणवर करण्यास सुरूवात केली. या युद्धामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराणच्या मोठ्या पुलाला टार्गेट करत हल्ला करण्यात आला. युद्धात एकही देश मदतीला पुढे येत नसल्याचे लक्षात देताच युद्ध लवकरात लवकर संपवण्याकरिता इस्त्रायलसोबत मिळून इराणमध्ये अमेरिकेकडून थैमान घातला जात आहे. इराण आणि अमेरिका युद्धाला 35 दिवस होत आहेत. या युद्धामुळे जग भयंकर संकटात आहे. युद्ध फक्त तीन देशांपुरते मर्यादित राहिले नाही. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध जिंकायचे आहे. यादरम्यानच आणखी एक जगाची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे.
इराणसोबत युद्ध संपलेलं नसतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प हे आणखी एका देशावर हल्ला करणार आहेत. हा देश अमेरिकेचं राज्य फ्लोरिडापासून अवघ्या 170 किलोमीटर अंतरावर असून, या देशाची लोकसंख्या एक कोटी दहा लाखांच्या आसपास आहे. या देशाचं नाव क्यूबा आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आता क्यूबा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. क्यूबाच्या इतिहासावर नजर टाकल्यास गेल्या 67 वर्षांपासून क्यूबाची भूमी बळकवण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यामध्ये अमेरिकेच्या 13 राष्ट्राध्यक्षांना यश आलं नाही, त्यानंतर आता ट्रम्प देखील त्याच वाटेनं पुढे जात असून, त्यांनी पुढचा हल्ला क्यूबावर होणार असल्याचं म्हटलं आहे.
सध्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे, या युद्धाचा या देशावर एवढा भीषण परिणाम झाला आहे की, या देशाला होणाऱ्या सर्व प्रकराच्या इंधनाचा पुरवठा ठप्प झाला आहे. क्यूबा पूर्णपणे अंधारात बुडून गेला आहे. वीज, गॅस तसेच इतर कोणतंही इंधन सध्या या देशाकडे नाहीये. मात्र जरी असं असलं तरी देखील क्यूबा हा चीनी कॉफी, नॅचरल रिसोर्सोज आणि मिनरल्ससाठी जग प्रसिद्ध आहे.