अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर
अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर
img
वैष्णवी सांगळे
अमेरिकेत एक खळबळजनक घटना घडली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाइट हाऊसच्या जवळ गोळीबाराची घटना घडली आहे. रविवारी पहाटे व्हाइट हाऊसच्या समोर असलेल्या लाफायेट पार्कजवळ हा गोळीबार झाला. घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.गोळीबार करणारा संशयित अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

रविवारी पहाटे व्हाइट हाऊसच्या समोर असलेल्या लाफायेट पार्कजवळ हा गोळीबार झाला. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळली आहे. या घटनेनंतर व्हाइट हाऊसच्या सुरक्षेमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे.या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील अनेक ब्लॉक बंद केले आहेत. सीक्रेट सर्विसने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची टीम मेट्रोपोलिटन पोलीस विभाग आणि यू.एस. पार्क पोलिसांच्या मदतीने एका संशयित व्यक्ती आणि वाहनाचा शोध घेत आहे. 

घटनेतील अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नाही आणि हा गोळीबार कोणत्या उद्देशाने करण्यात आला, हेदेखील स्पष्ट झालेले नाही. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते लाफायेट पार्क गेल्या काही आठवड्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असून तिथे बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे.ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये होते. दरम्यान, ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत गेल्या काही दिवसांत अनेक चिंताजनक घटना समोर आल्या आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group