गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका या दोन देशांमधील वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे.यामुळे जागतिक राजकारण चांगलंच तापलं आहे.इराणमध्ये तणावजन्य परिस्थिती आहे. दिवसेंदिवस इराणमधील हिंसाचार वाढतच चालला असून तिथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे, हिंसक निदर्शने आणि बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे दोन्ही देशांकडून हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे इराण संतापला असून आता इराणच्या सरकारी टीव्हीने डोनाल्ड ट्रम्प यांना गोळ्या घातल्याचे फुटेज प्रसारित केले आहे. हे फुटेज २०२४ सालचं आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये प्रचार करत होते. हल्ल्यादरम्यान त्यांच्या कानाजवळ गोळी लागली होती,तर यावेळी ते थोडक्यात बचावले होते. हाच व्हिडीओ पुन्हा रिलीज करण्यात आला आहे.
इराणच्या सरकारी टीव्हीने हे फुटेज प्रसारित केलं असून त्यासोबत एक कॅप्शनही दिली आहे. यावेळी गोळ्यांचं लक्ष चुकणार नाही असं त्यासोबत लिहीण्यात आलं आहे. त्यांचे लक्ष्य चुकवणार नाहीत. याचा अर्थ असा की जर हल्ला झाला तर ट्रम्प यांनाही सोडले जाणार नाही, असा इशाराच देण्यात आला आहे. हे फुटेज खूप व्हायरल होत आहे.