डोनाल्ड ट्रम्प यांच्या 50 टक्के कराला आता भारताचे चोख प्रत्युत्तर ; घेतला 'हा' मोठा निर्णय
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 50 टक्के कराला आता भारताचे चोख प्रत्युत्तर ; घेतला 'हा' मोठा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : अमेरिकेने 29 जुलै रोजी भारतावर 25 टक्के कर लावल्याची घोषणा केली होती. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी पुन्हा 25 टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केली होती.डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला अतिरिक्त कर 21 दिवसांच्या आत लागू होणार आहे. म्हणजेच 27 ऑगस्ट 2025 पासून हा कर लागू होणार आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 50 टक्के कराला आता भारताने चोख प्रत्युत्तर म्हणून एक मोठे पाऊल उचलले आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने तीन भारतीय अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले की, भारताने नवीन अमेरिकन शस्त्रे आणि विमाने खरेदी करण्याची आपली योजना पुढे ढकलली आहे. 

येत्या आठवड्यात ही विमाने आणि शस्त्रे खरेदीची घोषणा करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे अमेरिकेला जाणार होते. मात्र आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. भारताने अमेरिकन विमाने खरेदी केली असती तर त्याचा फायदा अमेरिकन अर्थव्यवस्थेला झाला असता, मात्र आता भारताने आपली योजना पुढे ढकलल्याने अमेरिकेला फटका बसण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group