डोनाल्ड ट्रम्प यांना झटका ! रशियाने खास भारतासाठी घेतला मोठा निर्णय
डोनाल्ड ट्रम्प यांना झटका ! रशियाने खास भारतासाठी घेतला मोठा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अमेरिका ही भारतावर दबाव टाकत आहे. रशियाकडून तेल खरेदी करणे भारताने तात्काळ बंद करावे, यासाठी तब्बल ५० टक्के टॅरिफ हा लावण्यात आला. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवले असून अमेरिकेसोबतची चर्चा देखील बंद केली. अमेरिकेने ५० टक्के टॅरिफ लावल्यामुळे भारतावर त्याचा काही क्षेत्रांमध्ये थेट परिणाम झाला आहे. आता रशियाने भारतासाठी त्यांची बाजारपेठेत पूर्ण खुली करत खास भारतासाठी मोठा निर्णय घेतला आहे. 

धक्कादायक ! बलात्कार प्रकरणात ताब्यात असलेल्या आमदाराने पोलिसांवरच झाडल्या गोळ्या, पुढे...

रशियाने जो निर्णय घेतलाय, त्यामुळे अमेरिकेचा आणखी जळफळाट होणार आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करु नये, म्हणून अमेरिकेकडून दबाव टाकला जातोय. मात्र अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता भारताची रशियाकडून तेल खरेदी सुरुच आहे. आता रशियाने भारतासोबतच्या तेल व्यापाराबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतासाठी रशियन तेल खरेदी अजून स्वस्त होणार आहे.

मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, OBC तून आरक्षण दिल्यास आम्हीही... छगन भुजबळांचा इशारा

रशियाकडून मिळणारं तेल आता अजून 3 ते 4 डॉलरने स्वस्त होणार आहे. रशियाने तेलाच्या प्रति बॅरलवर 3 ते 4 डॉलर डिस्काऊंटची भारताला ऑफर दिली आहे. एकप्रकारे हा अमेरिकेला डिवचणारा निर्णय आहे. कारण भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावीच असा मोठा दबाव अमेरिकेकडून टाकला जातोय. त्यात आता या डिस्काऊंट ऑफरमुळे भारताने रशियाकडून तेल आयात वाढवली, तर तो ट्रम्प प्रशासनासाठी एक धक्का असेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group