मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, OBC तून आरक्षण दिल्यास आम्हीही...  छगन भुजबळांचा इशारा
मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, OBC तून आरक्षण दिल्यास आम्हीही... छगन भुजबळांचा इशारा
img
वैष्णवी सांगळे
ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन सुरु आहे. तर, दुसरीकडे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये म्हणत ओबीसी नेतेही एकवटले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक संपन्न झाली. 

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मी कुणबी आणि मराठा वेगळे असल्याचे दाखले दिले आहेत. मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, जर तुम्ही निर्णय घेतला तर आम्हाला देखील मुंबईला यावं लागेल, असे म्हणत छगन भुजबळ यांनीही ओबीसी आंदोलकांच्यावतीने मुंबई जाम करण्याचा इशारा दिलाय. उद्यापासून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको ही भूमिका घेऊन राज्यभर आंदोलने केली जातील आणि निवेदन देखील दिल जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटलं. 

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयांवर सरकार पुन्हा एकदा कोंडीत सापडले आहेत. आज कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत सोडण्याचे आदेश दिले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group