मोठी राजकीय बातमी :
मोठी राजकीय बातमी : "राज आणि उद्धव एकत्र आले तर...." ; अजित पवारांच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य
img
Dipali Ghadwaje
नाशिक :  मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होण्याच्या चर्चांवरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिग्गज नेते तथा आमदार छगन भुजबळ यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात अनेकांची इच्छा आहे की त्या दोघांनी एकत्र यावं. पण एकत्र येण्याची संधी त्यांना २०२४ सालीच होती, कारण त्यावेळी सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. तुम्ही आम्ही कल्पनाही करू शकत नाही, अशा राजकीय घडामोडी मागच्या काळात तुम्ही आम्ही पाहिल्या आहेत, असं भुजबळ म्हणाले.

सरकार पडलं, दुसरं सरकार आलंय. राजकारणात काहीही होऊ शकतं. मात्र एवढ्या घाईघाईत होईल, असं मला वाटत नाही. राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद पुन्हा निर्माण होईल.

मुंबई महापालिका निवडणूक कधीही येईल आणि त्या दृष्टीने राज ठाकरेंची उपयुक्तता सर्व लोकांना वाटणं स्वाभाविक आहे. राज ठाकरेंना देखील वाटत असेल आपण एखाद्या मोठ्या पक्षासोबत राहिलो तर याआधी त्यांना जे अनेकवेळा अपयश आलं ते येणार नाही. ते एकत्र यावेत, सर्व शिवसैनिकांची इच्छा, मात्र दोघांच एकत्र येणं, त्या दोघांवर अवलंबून आहे , असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group