मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल; त्यांच्या कार्यालयाने केला
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल; त्यांच्या कार्यालयाने केला
img
दैनिक भ्रमर


"मंत्री छगन भुजबळ हे प्रकृती अस्वस्थ झाल्याने मुंबईला जसलोक रुग्णालयात दाखल झाले आहेत, अशी माहिती हाती येत आहे. छातीत दुखत असल्याने उद्या एंजॉग्राफी होण्याची माहिती समजत आहे" अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्याबाबत भुजबळ यांच्या कार्यालयाकडून खालीलप्रमाणे खुलासा करण्यात आला आहे.

त्यात म्हटले आहे, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे पूर्वनियोजित नियमित तपासण्यांसाठी (रूटीन चेकअप) जसलोक रुग्णालय याठिकाणी दाखल झाले आहेत.  
आवश्यक त्या चाचण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्याने ते जसलोक रुग्णालय याठिकाणी उपचार घेणार आहेत. मा. छगन भुजबळ यांची प्रकृती उत्तम असून कृपया कोणीही गैरसमज पसरवू नये.
इतर बातम्या
Join Whatsapp Group