राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उद्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भुजबळ आज मुंबईत येणार असून दोन दिवस समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करूनही एकही नेता भेटायला आला नाही, किंवा एकाही नेत्याने विचारपूस केली नसल्याने भुजबळ अधिकच नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच भुजबळ यांच्या अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर भुजबळ आज आणि उद्या मुंबईतील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यांची मते जाणून घेणार आहेत. त्यानंतरच ते मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे छगन भुजबळ आता काय निर्णय घेता आणि येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात काय पहायला मिळेल याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागलं आहे.