महायुतीत मोठी घडामोड! समीर भुजबळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा , शिंदेंच्या आमदाराला करणार चॅलेंज
महायुतीत मोठी घडामोड! समीर भुजबळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा , शिंदेंच्या आमदाराला करणार चॅलेंज
img
Dipali Ghadwaje
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्ताच राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा झाली. तसेच अमित शाह यांनी यावेळी तीनही नेत्यांना महायुतीमधील बंडखोरी रोखा, अशी सूचना केली. पण अस असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या घरातील सदस्यानेच बंड पुकारलं आहे. 

नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण याच ठिकाणाहून छगन भुजबळ यांचे पुतणे तथा माजी खासदार समीर भुजबळ हे इच्छुक आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

तसेच त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर आरोप करत आपण नांदगावमधून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, आपण 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार, अशी माहिती समीर भुजबळ यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे आपण अपक्ष लढणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

“गेले अनेक दिवस मी या मतदारसंघात दौरे करत होतो. पंकज भुजबळ यांनी 10 वर्ष इथे काम केलं. आमचं संघटन इथे मजबूत आहे. गावपातळीवर आमचं संघटन आहे. मी 2009 मध्ये खासदार असताना देखील मी पक्षाचे चिन्ह गावपातळीवर पोहोचवण्याचे काम केले. नाशिकमध्ये अनेक विकासात्मक कामे केली. मुंबई-नाशिक हायवे, उड्डाणपूल, एअरपोर्ट, बोटॅक्लब या सारखे अनेक कामे केली. नाशिकला नावारूपाला आणण्याचे काम केले. विकासाचे काम सातत्याने केले. मुंबई नाका येथे आशिया खंडातील सर्वात मोठा पुतळा बसवला. किकवी धरणाला मंजुरी मिळवून देण्यात माझा मोठा वाटा आहे”, असा दावा समीर भुजबळ यांनी केला.
 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group