मोठी बातमी : मुंबईत अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंनी गुपचूप दिल्ली गाठली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी : मुंबईत अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंनी गुपचूप दिल्ली गाठली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
img
DB
मंबई :  राज्याच्या राजकारणातून  एक मोठी बातमी समोर आली आहे.  मुंबईत अधिवेशन सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या गाठीभेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे. शिंदेंनी अचानक केलेल्या या दिल्लीवारीमुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान नियोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे. तर या दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र यागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group