मुंबई : आत्ताच एक मोठी समोर आली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेची लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
महिला आणि बालकल्याण विभागागाने दिलेल्या माहितीनुसार, याआधी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, सद्य:स्थितीत ही प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.सरकारच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतील सध्या लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे.
सध्या तरी ही छाननी निवडणुकांनंतरच केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकांनंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरछाननी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.