दैनिक भ्रमर : राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे. यातून अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावरच आदिती तटकरेंची मोठी घोषणा केली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यावरच राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. सध्या मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे. अनेक लाभार्थींना अन्य योजनांचा लाभ मिळत असेल. यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात. काही पहिल्याच पडताळणीत बाद ठरल्या असतील.
आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंगणवाडी सेविका सर्व महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहे. त्या महिलांना प्रश्न विचारणार आहेत. त्यातून जर एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जातील.