लाडकी बहीण योजनेचे जवळपास अडीच कोटी लाभार्थी आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
लाडक्या बहिणींना ४० हजार रुपयांचे कर्ज देणारी योजना सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.परंतु लाडक्या बहिणींसाठी अशी कोणतीही योजना राबवणार नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.
आदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नवीन योजना सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना ४० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.या ४० हजार रुपयांनी महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करता येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता अशी कोणतीही योजना नाही असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. लाडक्या बहिणींसाठी अशी कोणतीही वेगळी योजना राबवण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे.
जुलैचा हप्ता कधी?
लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. जूनचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलैचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये दिला जाईल किंवा सणासुदीचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.